महिलांनो घाई करा… ‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा एक संधी, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Ladaki bahin Yojana Online : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप काही तांत्रिक कारणांमुळे काही महिलांना अर्ज करता आले नव्हते त्यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

➡️ लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू इथे क्लिक करून अर्ज करा ⬅️

 

महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या या मुदतवाढीमुळे महिला वर्गाला दिलासा मिळाला आहे.

 

पाच महिन्याचे 7500 रुपये एकदाच खात्यात झाले जमा

👉 तुमचे यादीत नाव चेक करा 👈

 

आतापर्यंत काही कारणामुळे ज्या महिलांना लाभार्थी होता आलेलं नाही, त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कारण सरकारने या योजनेला मुदतवाढ दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी आता 15 ऑक्टोबर 2024 ही अंतिम तारीख असणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना अर्ज करायचे आहेत ते आता 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी आधी 1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. नंतर ती मुदत वाढवून 31 ऑगस्ट 2024 केली. त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढवून 30 सप्टेंबर 2024 केली. आता तिसऱ्यांदा मुदतवाढ करून ती 15 ऑक्टोंबर 2024 करण्यात आली आहे.

 

पाच महिन्याचे 7500 रुपये एकदाच खात्यात झाले जमा

👉 तुमचे यादीत नाव चेक करा 👈

 

Leave a Comment