तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे कसे तपासायचे?
- जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी प्रथम https://pmkisan.gov.in/ वर जा.
- मुख्यपृष्ठावरील संबंधित लिंकवर क्लिक करा आणि तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
- यानंतर कॅप्चा प्रविष्ट करा.
- यानंतर Get Status वर क्लिक करा.
- यानंतर, हप्त्याशी संबंधित स्थिती स्क्रीनवर दिसेल.
- मोबाईल ॲपद्वारे शेतकरी त्यांच्या पेमेंटची स्थिती तपासू शकतात.
लाभार्थी यादीत असे तपासा नाव
- सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी (https://pmkisan.gov.in/) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- यानंतर तुम्हाला पोर्टलवर दिसत असलेल्या नो युवर स्टेटसचा पर्याय निवडावा लागेल.– नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. आता तुम्हाला एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल.
- नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमची स्थिती कळेल.
- तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल.
- आता तुम्ही लाभार्थी यादी डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते पाहू शकता.